Weekly Group Sitting & Monthly 1 Day course only for old Students

1) साप्ताहिक सामूहिक साधना व सर्वांसाठी आनापान

“सुखा संघस सामग्गी,समग्गान तपो सुखो”

“एक साथ तप करना सुखकारक है”

पत्ता :-

सुयश विद्यालय , गरुड बंगल्यासमोर , डोमिनोज पिझ्झा च्या मागे.

रविवारी सकाळी 

08:00 ते 09:00:- सामूहिक साधना – फक्त जुने साधक

09.00 ते 09.30:- आनापान सती साधना सर्वांसाठी खुले आहे..

नमस्कार,

 सर्व जुन्या साधकां करीता प्रत्येक रविवारी सामुहिक साधना  आयोजीत केली आहे. तरी सर्व जुन्या साधकांना ( ज्यांनी आचार्य गोएंका गुरुजींच्या परंपरेत दहा दिवसीय कोर्स केला आहे असे ) विनंती आहे. त्यांनी या रविवारी सकाळी 08:00 ते 09:00 या वेळेत सामुहिक साधने करीता वेळ काढावा. कमीत कमी 5 मिनिटे आधी साधने साठी यावे ही विनंती.

  सामूहिक साधनेनंतर नऊ ला सर्वांसाठी आनापान म्हणजे ज्या लोकांनी या परंपरेतील दहा दिवसाचा कोर्स केलेला नाही अशासाठी आनापान साधना शिकवण्याचे सत्र आयोजित केले आहे..

आपल्या परिवारातील सर्वानी यावे ही विनंती अणि आपल्या परिचय असलेल्या सर्वाना माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत….🙏

2) एक दिवसीय विपश्यना ध्यान शिबीर – धम्मसिद्धपुरी विपश्यना ध्यान केंद्र ( भाटेवाडी ) , सोलापूर येथे

दिनांक : महिन्याच्या दुसऱ्या रविवारी
वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत

पात्रता निकष:– फक्त जुन्या ( ज्यांनी यापूर्वी एक दहा दिवसांचे विपश्यना शिबिर पूर्ण केले आहे अशा ) पुरूष व महिला साधकांसाठी !

तरी इच्छुक साधकांनी या शिबिरात सामील होऊन तपोदानाच्या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. आपल्या इतर विपश्यना साधक बंधू आणि भगिनींनाही माहिती सांगा. ( येथे दुपारी अल्पोपहाराची सोय कैली आहे).!

आपण स्वतःचे वहानाने डायरेक्ट धम्मसिद्धपुरी ध्यान केंद्र भाटेवाडी , सोलापूर येथे यावे!

नियम:-
1) एकदिवसीय शिबिर काळात पूर्ण मौन पाळणे आवश्यक आहे ..
2) या कालावधीत मोबाईल बंद करणे.. ( स्विच ऑफ ) करणे आवश्यक .
3) शिबीर पूर्ण वेळ थांबणे आवश्यक.. शिबीर मध्येच सोडून जाता येणार नाही.

या शिबिरात सहभागी होण्यासाठी फोनवरून नावनोंदणी आवश्यक आहे

नाव नोंदणी व अधीक माहिती साठी संपर्क :-
7620592920

मंगल हों !